आमच्याबद्दल

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेची स्थापना सामाजिक विचार आणि ध्येय-ध्यासातून झालेली आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक गरज भासत असते. ही गरज भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा लोकांची ही आर्थिक गरज विनाअडचण भागविता यावी, या मूळ हेतूतून ‘आदर्श महिला नागरी सहकारी बँके’ची कल्पना सुचली. पुढे त्यासंदर्भात समविचारी महिला वर्गाशी चर्चा केली. त्या सर्वांच्या विचारमंथनातून आदर्श महिला नागरी सहकारी बँक स्थापन करण्याचा विचार करण्यात आला.

सहकार खात्याशी संपर्क साधून त्यामार्फत रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करून दिनांक ३० मे १९९७ रोजी बँकेची नोंदणी झाली. रिझर्व्ह बँकेकडून ४ ऑक्टोबर १९९७ रोजी बँक कार्यरत करण्यासाठीचा परवाना मिळाला. त्यानंतर आदरणीय कै. गोविंदभाई श्रॉफ व मा. बापूसाहेब पुजारी या मान्यवरांच्या शुभहस्ते, सभासद, प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत ३१ जानेवारी १९९८ रोजी बँकेचे उद्घाटन झालेे.

कामकाजाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘आदर्श महिला नागरी सहकारी बँके’ने आपल्या विचारध्येयाला कधीच फाटा दिला नाही. त्यामुळेच या बँकेशी महिला आणि गरजू व्यक्तींचे अतूट असे नाते जुळले आहे. बँकेचा सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा बँकेवर अढळ, अभंग विश्वास बसलेला आहे. एका विचारप्रेरणेतून आकारास आलेली ‘आदर्श महिला नागरी सहकारी बँक’ ही महिलांच्या आर्थिक उद्धारासाठी कार्यरत आहे.

बँकेची ही प्रतिमा जनमानसात कायम राहावी, यासाठी बँकेचे संचालिका मंडळ, कर्मचारीवर्ग आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहेत. बँका या देशाच्या आर्थिक विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखल्या जातात. औरंगाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.

बँकेने खऱ्या अर्थाने तळागाळातील दीन-दलित ग्राहकांनादेखील मानाने वागवून त्यांना बँकेमार्फत सेवा दिली आहे. प्रामुख्याने गरिबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. मूलत: आमची बँक ही महिलांची आहे आणि हा महिला घटक घरादारात आर्थिक बाबतीत अगदीच उपेक्षित दिसून येतो. म्हणून अशा घटकाला प्रोत्साहित करून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा आमचा जो मूळ उद्देश होता, त्याची पूर्तता केली जात आहे. या कार्याचा आम्हाला परमोच्च आनंद मिळतो.

आपणास सांगण्यास आनंद वाटतो की, आज रोजी आमच्या बँकेने कार्यक्षेत्रातील जवळपास ६९ महिला बचतगटांमधील ७५० सभासदांना रु. ३० लाख एवढे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रामीण भागातील महिला चालवीत असलेल्या सहकारी दूध संस्थांतील महिला सभासदांना कर्जवाटप करून त्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे हजारो गरजूंना स्वतंत्र व्यवसाय निर्माण करणे सहज शक्य झाले आहे.

TOP