आदर्श महिला नागरी सहकारी बँकेमध्ये आपले स्वागत आहे.

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेची स्थापना सामाजिक विचार आणि ध्येय-ध्यासातून झालेली आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक गरज भासत असते. ही गरज भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा लोकांची ही आर्थिक गरज विनाअडचण भागविता यावी, या मूळ हेतूतून ‘आदर्श महिला नागरी सहकारी बँके’ची कल्पना सुचली. पुढे त्यासंदर्भात समविचारी महिला वर्गाशी चर्चा केली. त्या सर्वांच्या विचारमंथनातून आदर्श महिला नागरी सहकारी बँक स्थापन करण्याचा विचार करण्यात आला.

सहकार खात्याशी संपर्क साधून त्यामार्फत रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर करून दिनांक ३० मे १९९७ रोजी बँकेची नोंदणी झाली. रिझर्व्ह बँकेकडून ४ ऑक्टोबर १९९७ रोजी बँक कार्यरत करण्यासाठीचा परवाना मिळाला. त्यानंतर आदरणीय कै. गोविंदभाई श्रॉफ व मा. बापूसाहेब पुजारी या मान्यवरांच्या शुभहस्ते, सभासद, प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत ३१ जानेवारी १९९८ रोजी बँकेचे उद्घाटन झाले.

आमची बँकिंग सुविधा

Locker facility Adarsh Mahila Bank Aurangabad

लॉकर सुविधा

आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी आमची लॉकर सुविधा. सुरक्षित आणि विश्वसनीय जागा अगदी अत्यल्प दरात. आपल्या गरजेनुसार विविध आकारात उपलब्ध.

Rtgs/ neft facility available at adarsh mahila bank aurangabad

एनईएफटी / आरटीजीएस सुविधा

एनईएफटी माध्यमातून छोट्या बचत खातेधारकांसाठी आणि आरटीईजीएस अंतर्गत मोठ्या व्यावसायिकांना पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध.

sms facility at adarsh mahila bank aurangabad

एसएमएस सुविधा

सर्व बचत, चालू, कॅश क्रेडिट खातेधारकांना सर्व खाते व्यवहारांची माहिती संदेशाच्या माध्यमातून देण्यात येईल. आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घेणे आणि आपल्या शेवटच्या व्यवहाराची माहिती आता आपल्या मोबाईल वर मिळेल.

gold loan facility at adarsh mahila bank aurangabad

सोने तारणावर त्वरित कर्ज

सोने कर्ज मिळविण्यासाठी सोपी आणि सोयीस्कर अर्ज प्रक्रिया. हा एक सुरक्षित पर्याय असून तुम्हाला तत्काळ आणि कमी व्याज दरात कर्ज देते.कोणत्याही इतर शुल्क नाही.

cdm facility

सी.डी.एम., ए.टी.एम.मशीनची सुविधा

पैसे काढण्याच्या सुविधेसोबतच आता पैसे भरण्याची 24 तास सुविधा ग्राहकांना कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) उपलब्ध आहे. त्यामुळे बँकेत जाऊन पैसे भरण्यासाठी रांग लावण्याची गरज भासणार नाही. बँकेची अनेक मुख्य ठिकाणी सीडीएम/ एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Eletricity Bills

वीज बिल देयके

ग्राहकांना ‘आरटीजीएस व एनईएफटी’ चा अर्ज महावितरणने दिलेल्या व्हर्च्युअल बँक खात्याची माहिती बँकेत देऊन या सुविधेचा लाभ घेता येईल.

TOP